🕒 1 min read
मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली होती. त्यावेळी राजभवनाच्या सचिवालयानं यासंदर्भातील यादी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. राजभवन सुरक्षित ठिकाणाहून फाईल गायब होते. म्हणजे राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवलीये का ? असा सवाल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजप आणि राज्यपाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या काळात निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना 12 आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचं राजकारण सुरु आहे,’ अशी टीका शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे.
पुढे त्यांनी संजय राऊत यांना देखील लक्ष्य केलं. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज 12 , 12 ची टिमकी काय लावली आहे? तुमचे 12 वाजले आहेत काय? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. तसेच, भाजप तर याबाबत काही करत नाही, पण भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हे सुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे,’ असा थेट इशाराच आशिष शेलार यांनी राऊतांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली… मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; जीएसटी उपायुक्तांचा मृत्यू
- आरक्षण हक्काचं…! मुख्यमंत्री ठाकरेंसह चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका !
- अखेर प्रतिक्षा संपली! मनी हाईस्ट च्या आखेरच्या भागाची प्रदर्शनाची तारीख जाहिर
- इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली ‘हे’ दोन विक्रम नक्कीच नावावर करणार
- ‘तेव्हा ‘दीदी ओ दीदी’ केले, आता लोक ‘दादा गप्प बस दादा’ म्हणणार आहेत!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

