🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. तसेच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कॉंग्रेस आणि भाजप सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नागपुर येथे सभेदरम्यान बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस सध्या मृतावस्थेत असून त्यामध्ये जीव येणे कठीण आहे, तर भाजपमुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची टीका ओवेसींनी यांनी यावेळी केली. तसेच ते म्हणाले की, ‘आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. मात्र, भाजप ते स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, ‘नुकतंच राफेल लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत दाखल झाले, त्यावेळी त्या विमानाच्या चाकासमोर गृहमंत्र्यांनी लिंबू ठेवला. त्याबाबत आमचा विरोध नाही. पण, देशातील इतरांनाही त्यांच्या धर्मानुसार वागू दिलं पाहिजे. मात्र, या देशात एक धर्म, एक पक्ष राहील, असं हे सरकार म्हणतं’, असे यावेळी ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182862457238220800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182855708653436930?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

