महाराष्ट्र देशा टीम : बिग बॉस आणि सिनेमांपेक्षा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या एजाज खानच्या एका व्हिडीओेमुळे खळबळ माजली असून ट्विटरवर #अरेस्ट_एजाज_खान हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. सोशल मीडियिवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एजाज खाननं मुस्लीम लोकांना देशातल्या प्रत्येक समस्येचं कारण म्हटलं जाण्याचा विषयावर भाष्य केलं आहे.
या लाइव्ह व्हिडीओमध्ये एजाज खान म्हणाला, मुंगी मेली मुस्लीम जबाबदार, हत्ती मेला मुस्लीम जबाबदार, दिल्लीत भूकंप झाला मुस्लीम जबाबदार म्हणजे देशातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मुस्लीमांना जबाबदार ठरवलं जातं. मात्र हा बनाव रचला जात आहे. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हा व्हिडीओमध्ये एजाज खाननं या सर्व गोष्टींसाठी एका राजकीय पार्टीला जबाबदार ठरवलं आहे. त्यान 15 एप्रिलला रात्री 12.30 ला फेसबुक लाइव्ह केलं होतं.
या व्हिडीओमध्ये अनेक अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे सर्वांनी ट्विटरवरून एजाज खानच्या अटकेची मागणी केली आहे. सध्या ट्वीटरवर #अरेस्ट_एजाज_खान हा हॅशटॅश नंबर वन बनला आहे. एजाज खाननं या व्हिडीओमध्ये, कोरोनापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी काही लोक अशाप्रकारे त्याला धर्माशी जोडत असल्याचं म्हटलं आहे. या देशात काही लोक असे आहेत जे कोरोना सर्वांना व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत असंही या व्हिडीओेमध्ये एजाज खाननं म्हटलं आहे.
एजाज खानच्या व्हिडीओमधील सुरुवातीचा काही भाग ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओतील त्याच्या भाषेवरून त्याच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एजाज खआनला अटक करण्याची मागणी होत असून ट्वीटवर सध्या #अरेस्ट_एजाज_खान ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकांना रिट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत एजाज खानवर कारवाईची मागणी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

