Share

आ.सतीश चव्हाण यांची राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर नियुक्ती

Published On: 

औरंगाबाद: विधान परिषदेचे सभापती मा.ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेच्या सदस्यांमधून महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर आ.सतीश चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम (२) (त्र) अन्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाअंतर्गत विद्यापीठाने सादर केलेल्या सर्वसमावेशक सम्यक योजनेला मान्यता देणे, शिक्षण देताना, शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करताना, शिक्षणाचे प्रशासन व नियमन आदींमध्ये राष्ट्रीय व जागतिक पातळीवर होत असलेला विकास जाणून घेणे ही कार्ये समाविष्ट आहेत. तसेच या कार्याचा मागोवा घेणे व त्या बदलानुरूप राज्यातील शिक्षण पध्दतीमध्ये यथोचित धोरण व कार्यतंत्र विकसित करणे महत्वाची कर्तव्ये या आयोगाअंतर्गत येतात.

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे. आमदार चव्हाण यांना शैक्षणिक, संशोधन आणि विकास परिसंस्थांमधील विविध ज्ञानस्त्रोत केंद्रांच्या जाळ्याच्या निर्मितीव्दारे माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनाची व्याप्ती व दर्जा यात वाढ करणारी संशोधन जर्नल्स, संशोधन व तंत्रज्ञान यांच्या आदानप्रदानासाठी वाव देणे आदी कार्य व कर्तव्ये पार पाडावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!