Share

बीसीसीआयचा आणखी एक प्रकार उघडकीस; आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या ‘या’ विदेशी खेळाडूचे थकवले पैसे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन बीसीसीआय भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघात भेदभाव करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. इंग्लंड दौऱ्याबाबत जे आरोप करण्यात आले त्यावर महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी पुढे येत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी १९ मे रोजी महिला क्रिकेटपटुच्या वार्षिक करार जाहीर होताच पुन्हा या चर्चाना उत आला होता. यादरम्यान एक नवी माहिती समोर आली आहे. १० वर्षापुर्वी आयपीएल खेळणाऱ्या एक विदेशी खेळाडूचे पैसे बीसीसीआयने अजुनही दिले नाहीत.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलु खेळाडू ब्रॅड हॉजला आयपीएलच्या चौथ्या हंगामातील ३५% रक्कम अजुनही मिळाली नसल्याचा आरोप ब्रॅड हॉजने केला आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात ब्रॅड हॉज हा कोची टस्कर्स संघाकडून खेळत होता. २०२० साली झालेल्या महिला टी-२० विश्वचषकातील महिला खेळाडुंना अद्यापही बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची बातमी समोर आली असता. बॅड हॉजने केलेल्या या खुलास्यामुळे बीसीसीआय चांगलाच वादात सापडला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटु संदर्भात एका बातमीला प्रतिक्रिया देताना हॉजने हा खुलासा केला आहे.

‘दहा वर्षापुर्वी केरळ टस्कर्सकडुन खेळणाऱ्या काही खेळाडुंची ३५% रक्कम अजुनही येणे बाकी आहे, बीसीसीआय तो पैसा पाठवु शकेल का?’ असे ट्विट हॉजने केला आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया व कोची टस्कर्स केरळ हे दोन नविन संघाचा समावेश स्पर्धेत करण्यात आला होता. मात्र नंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर दोन्ही संघाला स्पर्धेतुन बाहेर करण्यात आले होते. आयपीएलमध्ये ब्रॅड हॉजने सात हंगाम खेळताना केकेआर, कोची टस्कर्स केरला आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!