🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकांच्या काळात प्रत्येक नेता आपल्या विरोधी पक्षावर टीका करत असतो. टीका करत असताना आजपर्यंत अनेक नेत्यांनी आपण सभेत बोलतोय याच भान न ठेवता विरोधी पक्षाल शिव्याशाप देतानाही कोणतीही कसूर सोडली नाही. कालही गिरगावात राज ठाकरेंची प्रचार सभेत बोलताना जीभ घसरली. शिवसेनेवर टीका करता करता राज यांनी तोंडात आलेली शिवी एक अक्षर उच्चारून गिळली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगाव (ता. १० ) मध्ये झालेल्या सभेत आरे प्रकरणावरुन शिवसेना मुंबईकरांना वेड्यात काढत असल्याची टीका केली. ”अरे येथे मेट्रो ३ च्या कारशेडसाठी वृक्षतोड झाल्यानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ‘सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषित करु’अशी घोषणा केली. मात्र यावेळी बोलताना राज यांची जीभ घसरली आणि बोलता बोलता यांच्या तोंडात अचानक ‘काय म्हणजे काय च्यू…’ असं म्हणत राज थांबले आणि पुढे म्हणाले की, ‘ …म्हणजे आम्हाला मुर्ख समजलात का ?’ असा प्रश्नही राज यांनी शिवसेनेला केला.
तर शिवसेनेचे रामदास कदम हे पर्यावरण मंत्री आहेत. ते अरेतील झाडे तोडणे थांबू शकले नाहीत आणि आता युवा सेनाप्रमुख काय सांगतायत की आमच्या हातात सरकार दिल्यानंतर आम्ही त्याला जंगल म्हणून घोषित करु. आहेत कुठे झाडं ? असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे आणि रामदास कदम यांचा समाचारही घेतला. त्यानंतर शिवसेना युतीत सडली आणि १२४ जागांवर अडली असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. हया असल्या लोकांच्या आश्वासनांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायचं असेल तर सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठी मनसेला निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182539868716421126?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182551764584648705?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

