🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परप्रांतीय मजूरांची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्य सरकार काम करण्यात कुठेतरी कमी पडतंय याचेच हे लक्षण आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपला चांगलच फैलावर घेतल आहे.
भाजपा च्या मनात सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रावर प्रचंड राग आहे. राजकारण करताना कसलंही भान यांना राहिलेलं दिसत नाही. महाराष्ट्र लढवय्या आहे हे भाजपा ने विसरू नये. तुमच्या कुत्सित विचारसरणीला इथे थारा नाही. औरंगजेबाला याच मातीत दफन करणारा महाराष्ट्र आहे हे विसरु नका. असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.
भाजपा च्या मनात सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रावर प्रचंड राग आहे. राजकारण करताना कसलंही भान यांना राहिलेलं दिसत नाही. महाराष्ट्र लढवय्या आहे हे भाजपा ने विसरू नये. तुमच्या कुत्सित विचारसरणीला इथे थारा नाही. औरंगजेबाला याच मातीत दफन करणारा महाराष्ट्र आहे हे विसरु नका.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 15, 2020
दरम्यान, राजकारणात राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात चुकीचे नाही. त्या गोष्टी चालतच असतात परंतु संपूर्ण देशावर आज संकट आले आहे. त्यावेळी एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्याची ही स्थिती नाही. आणि म्हणून कोण कुठल्या पक्षाचे सरकार आहे किंवा दिल्लीत कुठल्या पक्षाचे राज्य आहे हे आजच्या घडीला महत्वाचे नाही. तर आज आपण सगळ्यांनी मिळून कोरोनाचा पराभव करायचा हा एककलमी कार्यक्रम आपल्यापुढे आहे त्यामुळे त्यादृष्टीने पावले टाकली पाहिजेत आणि अस्वस्थ असलेला समाजातील जो घटक आहे त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

