Share

‘सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा टराटरा फाटलाय’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी या सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे. त्यामुळे आता जनता हे सरकार उलथून टाकेल आणि परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘माझ्या सभांमध्ये जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार नक्की विजयी होतील अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. या सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे. त्यामुळे आता जनता हे सरकार उलथून टाकेल आणि परिवर्तन होईल असं विधान केले आहे.

पुढे बोलताना शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी शिवसेना विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी केवळ १२४ जागा लढवून मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहे. हे अवास्तव असल्याचं विधान केले आहे. त्यामुळे शिवसेना वारंवार करत असलेल्या मुळ्यामंत्रीपदाच्या दाव्याला त्यांनी लक्ष केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना ‘भाजपवर न केलेल्या कामांचा आणि निष्क्रियतेचा दबाव असल्याचं ते म्हणाले. सरकार जो माणूस बोलतो, त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावत आहे, तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीचं सरकार येईल इतक्या जागा नक्कीच मिळतील असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182855708653436930?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182685115052224512?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182683722992115712?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!