🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधाला. ते नाशिक येथे प्रचार सभेदरम्यान बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी केवळ 124 जागा लढवून मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहे, असे म्हणत कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष केला. तसेच कोल्हे यांनी युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या कमी जागा आणि बहुमतासाठी आवश्यक 145 जागांचा आकडा याची तुलना केली आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘माझ्या सभांमध्ये जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार नक्की विजयी होतील अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. या सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे. त्यामुळे आता जनता हे सरकार उलथून टाकेल आणि परिवर्तन होईल असं विधान केले आहे.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182871712611749890?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182871163002736646?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

