Share

तुम्ही सत्ता द्या; आम्ही तुळजापूर भवानी माता मंदिरास वैश्विक स्थळाचा दर्जा देऊ – अमित शहा

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : भाजप-शिवसेना सरकारला सत्ता द्या आम्ही तुळजापूर च्या भवानी माता मंदिरास वैश्विक स्तराचे पर्यटन बनवणार ,असे आश्वासन भाजपचे पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी उस्मानाबाद मतदारांना दिले.

तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचाराचा साठी पक्ष अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा घेण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना शहा बोलत होते. अमित शहा यांची महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा झाली.

शहा म्हणाले , देशात एकीकडे परिवार मोठा करणारा एक पक्ष आहे तर दुसरा भाजप हा पक्ष हा देशाला सुरक्षित बनवत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने पाच वर्षात तीन तीन वेळा मुख्यमंत्री बदलले आहेत, आम्ही तसे केले नाही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली.

फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने विकास केला आहे. फडणवीस गेल्या दहा दिवसापासून बघतोय की एकही भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केलेले नाही. भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचे काम फडणवीस केले आहे. असे सांगत फडणवीस सरकार पाठराखण अमित शहा यांनी केली.

दहा वर्ष काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर होते. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले. असा प्रश्न उपस्थित करत तेराव्या वित्त रिक्त संस्थेच्या अंतर्गत 1 लाख 15 हजार रुपये आघाडी सरकारने दिले होते. ,त्यात आम्ही वाढ करून ते चार लाख 22 हजार 707 रुपये इतके महाराष्ट्राला दिले आहे.

यात एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. विकासाच्या जोरावरच मी मदत मागतोय त्यामुळे शिवसेना भाजपला पुन्हा सरकार बनवा आम्ही तुळजापूरच्या मंदिरास वैश्विक स्तरावर पर्यटन बनवून. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पर्यटन स्थळाचा प्रचार प्रसार करू विश्व स्तरापर्यंत हे पर्यटन स्थळ पोहोचव अशी अमित शहा यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182585041701855232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182584928115933184?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!