Share

फिर भी मैं ३७० की बात करूंगा – अमित शहा

Published On: 

🕒 1 min read

औसा: माझ्याकडे सांगायला काही नाही. म्हणून मी कलम ३७०वरच बोलत आहे, असे म्हटले जाते. ते चुकीचे आहे. हमने सबकुछ किया है, फिर भी मैं ३७० की बात बारबार करूँगा, असे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा सांगत या कलम रद्दचे समर्थन केले.

लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघातील महायूतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठी किल्लारी येथे शहा यांची जाहीर सभा झाली. या वेळी ते बोलत होते. शहा म्हणाले, ‘‘आधीच्या सरकारने ३७०ला हात लावले नाही. हे त्या सरकारचे पाप होते. काश्मिरला कोणी हा छिनून घेऊ शकणार नाही. आम्ही स्वस्थ बसणार नाही. मोदींनी ३७० हटवून पक्षाचा संकल्प पूर्ण केल्याचे शहा यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवा

भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान करून मोदींचे हात मजबूत करा, देवेंद्र फडणवीस यांना पू्न्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा. गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने जेवढे नुकसान महाराष्ट्राचे केले आहे, ते व्याजासकट भरून काढत आम्ही महाराष्ट्राला देशात पहिल्या स्थानावर पोचवू, हा मी तुम्हाला शब्द देतो. त्यासाठी केंद्रात नरेंद्र आहेत. आता राज्यात पून्हा देवेंद्र हवेत, असेही शहा म्हणाले.

शहा म्हणाले, कलम ३७०ला हात लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. अनेक पंतप्रधान येऊन गेले. पण त्यांनी या विषयात हात घातला नाही. मोदींनी ती हिंमत दाखवली. पण या निर्णयाला काँग्रेस विरोध करीत आहे. काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट करावे, ते ३७०च्या बाजूने आहेत की विरोधात? आम्ही सर्जीकल स्ट्राईक केला. हे चांगले केले की वाईट? पण राहूल गांधी म्हणाले ‘पुरावा आणा’. तिच भाषा पाकिस्तानही करत आहे. राहुल गांधी आणि पाकिस्तानचे विचार एकसारखे कसे, असा मला प्रश्न वारंवार पडतो.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182585041701855232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182584928115933184?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182581064692162561?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!