टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्यांनी ‘मनमोहन सिंग कागदावर जे लिहिलं आहे, जे मॅडम लिहून द्यायच्या तेच वाचायचे. मनमोहन सिंग यांनी मलेशियात रशियासाठी लिहिलेलं भाषण वाचलं होतं असं विधान करत कॉंग्रेसवर निशाना साधला आहे.
पुढे बोलताना अमित शाह यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे हजारो लोक विमानतळाबाहेर जमा होतात आणि मोदींच्या नावे घोषणाबाजी करतात. यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच मोदी खूप परदेश दौरे करतात असा आरोप काँग्रेस करत असतं असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलताना मोदींच्या लोकप्रियतेविषयी भाष्य करताना गेल्या महिन्यात अमेरिकेतील ह्युस्टन येथे पार पडलेल्या नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रसिद्ध पंतप्रधान असल्याचं सिद्ध होत आहे असंही विधान केले आहे. तसेच मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे भारताचं जागतिक स्थान उंचावत असून अनेक परदेशी गुंतवणूक भारतात होत आहे असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मनमोहनसिंग हे भारताचे सलग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्यावर ते सोनिया गांधी यांच्या हातातले बाहुले असल्याचा आरोप होत आहे. त्याचाच धागा पकडून शाह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

