🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जीएसटी आणि व्यापारी वर्गाविषयी मोठ विधान केले आहे. त्यांनी व्यापारी वंचितसोबत येत नाहीत. त्यांनी भाजपसोबत लग्नच केलं आहे. पण व्यापाऱ्यांनी भाजपशी काडीमोड घेऊन वंचितसोबत यावं. भाजपचं सरकार पुन्हा आलं तर राष्ट्रीय बँकाही बुडतील असं विधान केले आहे.
पुढे बोलताना आंबेडकर यांनी जीएसटीतून सुटका करा अशी मागणी घेऊन एक शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. पण त्यांना सांगितलं, संधी होती तेव्हा तुम्ही काही केलं नाही आणि भाजपला मत दिलं. आता विधानसभा निवडणुका येत आहेत. वंचितला सत्ता द्या, जीएसटीमध्ये सुधारणा करु. महिन्याला हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा… यापेक्षा आयटीची सुधारित पद्धत आणली जाऊ शकते असं ते म्हणाले आहेत.
तसेच पुढे बोलताना ‘हिंदू राष्ट्रवाद आणि धर्मवाद आपल्याला मातीत घेऊन चाललाय. या राष्ट्रवादाने बँका बुडत आहेत. चार बँकेची मिळून एक बँक करणार असं म्हणतात. म्हणजेच बाकीच्या बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातात. बँक बुडणार म्हणून त्याचं विलिनीकरण केलं जातंय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही वंचित चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182862457238220800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182855708653436930?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182683586157088773?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

