🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली. ज्यात रिलायन्सचे मुकेश अंबानी हे गेल्या बारा वर्षांपासून पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी प्रथमच दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. या यादीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे पहिल्या टॉप ५ श्रीमंतांमध्ये ४ जण गुजराती आहेत. या यादीतील चार गुजराती उद्योगपतींची एकूण संपत्ती ७ लाख कोटी रुपये इतकी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ अब्ज डॉलर (३.५ लाख कोटी रुपये) आहे. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५.७ अब्ज डॉलर (१.१० लाख कोटी) रुपये इतकी आहे.या चार जणांची एकूण संपत्ती ९६.९ अब्ज डॉलर (७ लाख कोटी रुपये) आहे. गुजरातमधील चोरवाडचे रहिवासी मुकेश अंबानी यांच्या वडिलांनी सुरवातीला रिफायनरी ते टेलिकॉमचा व्यवसाय सांभाळला. त्यानंतर मुकेश यांनी जिओच्या माध्यमातून मोबाइल क्षेत्रात पदार्पण करून आपल्या संपत्तीत २८ हजार कोटी रुपयांची वाढ केली.
त्याचप्रमणे या यादीतील अदानी यांनी अहमदाबादमधून आपल्या व्यापाराला सुरवात केली. अदानी यांनी पहिल्यांदा भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. त्यांनी एअरपोर्ट व डेटा सेंटर्स या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. यादीत तिसऱ्या स्थानावर असणार हिंदुजा ब्रदर्स यांनी एकूण संपत्ती १५.६ अब्ज डॉलर ( १.०९ लाख कोटी) इतकी आहे. त्यानंतर या यादीतील चौथे श्रीमंत व्यक्ती म्हणून गुजरातचे शापूरजी ग्रुपचे पालोनजी मिस्त्री यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती १५ अब्ज डॉलर (१.०५ लाख कोटी)इतकी आहे. त्यांची सर्वाधिक गुंतवणूक टाटा सन्समध्ये आहे. कापूस उद्यागोपासून बँकिंगपर्यंत व्यापार करणारे गुजरातचे उदय कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. उदय कोटक यांची एकूण संपत्ती १४.८ अब्ज डॉलर (१.०२ लाख कोटी) इतकी आहे. कोटक यांनी १९८० मध्ये एका फायनान्सशियल संस्थेपासून पासून सुरुवात केली. ती आज कोटक महिंद्रा बँक म्हणून ओळखली जाते.
त्याखालोखाल सहाव्या स्थानावर शिव नादरज्यांची एकूण संपत्ती १.००८ लाख कोटी इतकी आहे. सातव्या स्थानावर राधाकृष्ण दमानी यांची एकूण संपत्ती १.००१ लाख कोटी आहे. आठव्या क्रमांकावर आहेत गोदरेज फॅमिली यांची एकूण संपत्ती ८४००० कोटी इतकी आहे. त्यानंतर लक्ष्मी मित्तल नवव्या स्थानावर असून त्यांनी एकूण संपत्ती ७३५०० कोटी इतकी आहे. तर दहाव्या स्थानावर कुमारमंगलम बिरला यांचा क्रमांक लागतो. बिरला यांची एकूण संपत्ती ६७२०० कोटी इतकी आहे. फोर्ब्सच्या या यादीत सहा नवीन चेहऱ्यांमध्ये एडटेक कंपनी बैजूचे संस्थापक बैजू रवींद्रण, हल्दीराम स्नॅक्सचे मनोहर लाल तथा मधुसूदन अग्रवाल, बाथरूम फिटिंग्सचे जॅग्युआर ब्रँडचे मालक राजेश मेहरा यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182903036068286464?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182903938229526528?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

