🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. त्याचे पडसाद देशात सर्वत्र पडत आहेत.
कुशल महादेव घुले या माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, जर पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची परवानगी मला देत असाल, तर मी जाण्यास तयार आहे.कुशल महादेव घुले हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवाशी आहेत.
माजी सैनिक कुशल घुलेंनी मोदींना पाठवलेल्या पत्र –
मोदीजी, मी कुशल महादेव घुले (माजी सैनिक). मी १७ वर्षे सैन्यात देशसेवा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना कसं जगावं लागतं, याची मला चांगली माहिती आहे. पाकिस्ताने १४ फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामात केलेल्या हल्ल्याला स्फोटकांनीच उत्तर द्यावे लागेल. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुनच हटवावे लागेल. तरच भारत देश आनंदाने राहू शकतो. आता ती वेळही आली आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आणि गर्व आहे, की तुम्ही पुलवामा हल्ल्याचा बदला नक्की घ्याल. सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेसाठी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदींना साथ द्यावी.
मोदीजी, तुम्हाला विनंती करतो की, पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची मला परावनगी दिल्यास, मी पाकिस्तानात जायला तयार आहे.
आपलाच माजी सैनिक
कुशल महादेव घुले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

