Share

अक्षयने आगामी चित्रपट ‘रामसेतु’च्या चित्रीकरणासाठी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली परवानगी

Published On: 

मुंबई :  राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आपल्या या दौऱ्यात योगी विविध उद्योजक, औद्यागिक कंपन्यांचे प्रतिनिधी, सिने तारेतारकांच्या भेटी घेतली

याचदरम्यान  योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावेळी काही बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांशी देखील संवाद साधला. मंगळवारी रात्री अक्षय कुमार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि त्यांच्या आगामी राम राम सेतु या चित्रपटाविषयी चर्चा केली.

आपल्या आगामी ‘रामसेतु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे इच्छा व्यक्त करत परवानगी मागितली आहे. अक्षय आदित्यनाथ यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर अयोध्यामध्ये आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री अक्षय कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बैठक झाली होती.

अक्षय कुमारने या बैठकीमध्ये चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात फिल्म सिटी सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल अक्षय कुमारने आनंद व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!