Share

कोरोनासमोर पाकिस्तान हतबल, भारताकडे मागितली मदत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक शक्तिशाली देशांना या कोरोनाने झोपवले आहे. अशातच आपल्या बाजूच्या पाकिस्तानमध्येही कोरोनाने आपले हातपाय पसरवले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या पाकिस्तानने आता जगाकडे आर्थिक मदत मागितली आहे. तर भारता कडेही मदत मागितली आहे. याबाबतचे वृत्त दै. लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे. याआधी अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे.

भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसाठी मदत मागणाऱ्या देशांमध्ये आता पाकिस्तानचाही समावेश झाला आहे. पाकिस्तानमध्ये करोनाचे सहा हजार रुग्ण सापडले असून १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोरोनाने पाकिस्तानला आपल्या विळख्यात घेतलं असल्याने. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका व्हीडोओद्वारे पाकिस्तानला मदत करा अशी याचना केली आहे. पाकिस्तानवर भुकमारीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे  अंतरराष्ट्रीय संघटनांनी आपल्याकडे लक्ष द्यावे व मदत करावी   अशी विनंती पाकिस्तानने केली आहे.

इम्रान खान यांनी ट्वीट करुन मदतीची मागणी केली आहे. मी आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्री आर्थिक संस्थांना अपील करतो की ज्या पद्धतीने विकसनशील देश कोविड-१९ महामारीचा सामना करत आहेत, त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली जावी असे ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!