Share

‘मासे मेले तर हे महाराज दोन दिवस घराबाहे पडले नाही, अन आता आमच्या अश्रुवर बोलतात’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्या भावनिक झाल्यावरुन, आता त्यांच्यावर विरोधक चांगलीच टीका करत आहेत. अजित पवारांचे अश्रू हे कर्माचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता यावर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिल आहे. बोलताना पवारांच्या जागी बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

माझे वडिल वारल्यानंतर माझ्या वडिलांच्या जागी मी शरद पवारांना पाहतोय. उद्धव ठाकरेंना काय बोलावं हे त्यांचा अधिकार आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी काय केलं, याच उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते आमच्या अश्रूवर बोलतात. उद्धव ठाकरेंनी एकदा परदेशातून मासे आणले होते, दुर्दैवाने ते मासे मेले. मग, हे महाराज दोन दिवस घराबाहेरच पडले नाहीत, कारण मासे मेले मासे मेले असं करत. तुम्हाला मासे मेले तर दु:ख होतंय. मग आमचं ब्लड रिलेशन आहे. मग दु:ख होणारच. समजा, बाळासाहेब असते आणि त्यांच्याबाबतीत असे काही घडले असते, तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यातून पाणी आलं नसतं का? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

दरम्यान, अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे हा राजीनामा भावनिक होऊन दिला होता का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ‘राजीनाम्याचा निर्णय हा भावनिक होऊन घेतला नव्हता. केवळ पत्रकार परिषदेत मी काही क्षण भावनिक झालो होतो, मी ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण मला कंट्रोल झालं नाही. त्यामुळे, मी राजीनाम्याचा निर्णय खूप विचाराअंती घेतला होता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182541555355152385?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182539868716421126?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!