🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळी करण्यात आलेली अटक ही वरिष्ठांच्या हट्टापायी करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती असं पवार म्हणाले आहेत.
यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेप्रकरणी अजित पवारांनी थेट छगन भुजबळांचं नाव घ्यावं असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना बाळासाहेबांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, हे मी बोलल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळालं. त्यावेळी न्यायालयाने बाळासाहेबांची सुटका केली म्हणून ठीक आहे. मात्र एवढं सगळं होत असताना शरद पवार गप्प का होते असंही ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांवर टीका केली. त्यांनी वर्ष निघून जातात, कालांतराने ती परिस्थिती आपल्यावरच उलटते. एका पवारांनी शिवसैनिक शिवसेनेच्या विरोधात उभा केला आणि आता आपले संभाजी पवार उमेदवार त्या गद्दारला गाडायला उभे राहिले आहेत असं ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183235417639772160?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183234546059243522?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183234231750672384?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

