🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे बाबत सूचक विधान केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आमचा कुठलाही संबंध नाहीये, असे अजित पवार म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अजित पवारांनी याबाबत भाष्य केले आहे.
हो / नाही म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तर राज्यभरात १०० हून अधिक उमेदवार उभे करत आम्हाला प्रबळ विरोधी पक्ष बनवा असा नारा दिला आहे. तर राज ठाकरे यांच्या मदतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसही धावून आली आहे. पुण्यात आणि ठाण्यात महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या उमेदवारांनी मनसेला पाठींबा दिला आहे. एकीकडे असे असताना अजित पवार मनसेशी काहीही सबंध नसल्याचं बोलत आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस १७५ जागांवर विजय मिळवणार असून सत्तेत येणार आहे. त्यामुळे आमचा राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत कुठलाही संबंध नाहीये असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182661218064130048?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182658951244058624?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182652870606258176?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

