Share

… म्हणून राज ठाकरेंना महाआघाडीत घेतले नाही – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांची मनसे ही आघाडीत समाविष्ट असेल असा तर्क लावण्यात येत होता. परंतु मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. राज ठाकरे महाआघाडीत का नाहीत याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.

अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याची आमची खूप इच्छा होती, परंतु काँग्रेसमुळे घेता आले नाही. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं असं म्हणत खेद व्यक्त केला. त्याचा परिणाम आघाडीच्या मतांवर होऊ शकतो.

पुढे बोलताना ‘राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काँग्रेस सोडून इतर मित्रपक्षांचा त्यास पाठींबा होता. परंतु काँग्रेसने मात्र त्यास विरोध केला. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकांमुळे काँग्रेस राज यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना अजित पवार यांनी ‘काँग्रेसला असे वाटते की, जर महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी आघाडी केली, तर त्याचा त्यांना उत्तर भारतात फटका बसेल. कदाचित काँग्रेसला राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात फायदा होईलही, परंतु काँग्रेसचे पारंपरिक उत्तर भारतीय मतदार काँग्रेसवर नाराज होतील म्हणून त्यांनी विरोध दर्शवला असं पवार म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182908437279072257?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182903938229526528?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182903036068286464?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!