🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. सर्वच महत्वाचे नेते उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसून येत आहेत. भाजपने तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही प्रचारात व्यस्त आहेत.
ही सर्व रणधुमाळी सुरु असताना कॉंग्रेसकडून मात्र राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रचारासाठी आलेले दिसत नाहीत. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकिषयी भाष्य करताना राष्ट्राडीचे नेते अजित पवार यांनी ‘राहुल गांधी जर महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते झाकोळून जातील. त्यामुळे या नेत्यांना संधी देण्यासाठीच राहुल गांधी अद्यापपर्यंत महाराष्ट्रात आले नसतील, असं मला वाटतं असं विधान केले आहे.
पुढे बोलताना पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भाष्य करताना ‘आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ करू. कारण राज्यासह केंद्रातही आमची सत्ता आहे. असं आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खासगीत बोलताना सांगितलं होतं,’ असा गौप्यस्फोट केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या २१ ऑक्टोबरला होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानाचा दिवस जवळ आला असल्याने सर्वच राजकीय पक्ष हे प्रचारात व्यस्त आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182969327005261825?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182967503313522688?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182965079186165760?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

