Share

अहमदनगर : खाजगी वाहनांसाठीही मिळणार पेट्रोल – डिझेल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्ह्यात शासकीय वाहने, ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा यांनाच पेट्रोल-डिझेलची सुविधा असल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा पहिल्यासारखेच सर्वांना पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. याबाबतच वृत्त सरकारनामा या वृत्त संकेतस्थळाने दिलं आहे.

पहाटे ५ ते सकाळी ९या वेळेत पेट्रोल आणि पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत डिझेल सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे. याबाबतचे दुरुस्ती आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज जारी केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जारी करण्यात आले होते. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी १३ एप्रिल रोजी रात्री पेट्रोल-डिझेल विक्रीसंदर्भात आदेश जारी केले.

त्यात सर्व खासगी चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी पेट्रोलविक्री पूर्णतः बंद करण्यात आली होती . शासकीय वाहने ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सेवेशी निगडित कर्मचारी यांना ओळखपत्रे तपासून पेट्रोलविक्री करण्यात यावी, याव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल विक्री करण्यास मनाई केली होती.

दरम्यान, या आदेशाने निर्माण झालेल्या अडचणींकडे अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सायंकाळी पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत दुरुस्ती आदेश काढण्यात आले. नव्या आदेशानुसार पेट्रोल-डिझेल सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!