अहमदनगर : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी राजशिष्टाचाराचा भंग केला आहे. नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची बैठक घेतली.
सुजय विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून बैठक घेतल्याने जिल्हापरिषदेतील सभापती आणि अधिकारी नाराज झाले.
शालिनी विखे पाटील ह्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तर नवनिर्वाचित खासदार सुजय विखे त्यांचे पुत्र आहेत. तरीही पदाच्या राजशिष्टाचाराचा भाग म्हणून सुजय विखे यांनी खबरदारी घायायला हवी होती,अशी चर्चा होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात विखे कुटुंब पूर्वीपासून राजकारणात आहे. सुशिक्षित नवनिर्वाचित खासदर सुजय विखे यांच्याकडून अशी चूक होणे बरोबर नाही असंही एकंदर सूर उपस्थितांमध्ये होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

