जालना : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० दिवसांपासून ठिय्या आदोलन सुरू आहे. महिनाभरानंतर हे आंदोलक आता आणखी आक्रमक झाले आहेत. येत्या ७ मार्चला आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मेळावा होणार आहे. दरम्यान, साष्टपिंपळगाव येथे दररोज शेकडो नागरिक येऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा वर्षानुवर्षे राजकीय चेंडू केला जातोय. या-ना त्या कारणाने विनाकारणच मराठा आरक्षण भिजत घोंगडे नेतेमंडळींनी ठेवले आहे. मराठा आरक्षण प्रश्नाबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इच्छाशक्ती न दाखवल्याने मराठा तरुणांना बेहालपणे भविष्य जगावे लागत आहे. यामुळे राज्य सरकारने याबाबात ठोस पावले उचलण्याची मागणी आंदोलकांकडून होत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे २० जानेवारी पासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरु आहे. याठिकाणी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या राज्यव्यापी अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही; खोतकर
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- पाण्याच्या टाकीत सापडले होते दोन सांगडे; 8 वर्षांनंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
- लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीच्या पाठीवर चाकूने वार; दीड लाख रुपयांची रक्कम लंपास
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

