🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या या बॉलिवूडमधील कलाकार अनेक दिग्गज कलाकरलोकांना मदत करण्यासाठी पुढे आले. त्यानंतर आता ‘जन्नत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुढे आलेली अभिनेत्री सोनल चौहानने देखील मदतीचा हात पुढे केला. सोनल चौहानने एका मंदिराबाहेरील गरिबांना बिस्कीट आणि पाणी वाटप केलं. मात्र तीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावरून तिला ट्रोल करण्यात आले.
https://www.instagram.com/p/CPKxa2eDGhx/?utm_source=ig_web_copy_link
सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर तिने पब्लिसिटीसाठी बिस्कीट वाटप केल्याचा आरोप युजर्सने केला आहे. तर सोशल मीडियावर ट्रोलिंसाठी नेटकऱ्यांची टार्गेट बनल्यानंतर काही फॅन्सनी तिच्या या उपक्रमाचं कौतूक देखील केलं.
महामारीच्या काळात गरीबांना मदत करण्यासाठी तिनं प्रोत्साहन देखील केलंय. यासाठी तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये सोनल चौहानने लिहिलं, ‘गरीबांना मदत करण्यासाठी तुमच्याकडून जे जे शक्य होईल ते सर्व करा. जर आपण या सर्वांना एकत्र येऊन मदत केली तर रस्त्यावर कुणीच गरीब उपाशी पोटी झोपणार नाही. कारण काही जण कसे बसे भूक भागवतात, पण काही जणांकडे आपली भूक भागवण्यासाठी पर्याय उपलब्ध नसतो,’ असे तिने यावेळी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
- आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर
- पदोन्नती आरक्षण : सरकारमधील वाद टोकाला, कॉंग्रेस मंत्र्याने दिला थेट ‘हा’ इशारा
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

