Share

३२ तासांच्या प्रतिक्षेनंतर सिडकोवासियांच्या नळाला पाणी

Published On: 

औरंगाबाद : जायकवाडी धरणात १४०० मिलीमीटर व्यासाच्या पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बिघडल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मोठ्या कसरतीने पर्यायी ट्रान्सफार्मर बसवून गुरूवारी सायंकाळी चार वाजेनंतर पाणी उपसा सुरू केला.

त्यानंतर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होऊन शहरातील जलकुंभ भरून प्रत्यक्ष नळांना पाणी सोडण्यात आले. यात सुमारे ३२ तासांचा अवधी गेला. शुक्रवारी (दि.१९) पहाटे चार वाजेनंतर शहरात नियोजित वसाहतींत पाणीपुरवठा सुरू झाला.

बुधवारी रात्री साडेआठ वाजता जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात १४०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या ट्रान्सफार्मरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यावर पालिकेच्या विनंतीवरून चिकलठाणा एमआयडीसीतील ट्रान्सझेल्टा कंपनी अभियंत्यांनी अर्ध्या रात्री ट्रान्सफार्मरची तपासणी केली, तेव्हा त्यातून ऑइल बाहेर आलेले दिसले. त्यात मोठा बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे दुसर्‍या दिवशी गुरूवारी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बी.डी. घुले यांनी कर्मचार्‍यांकरवी पर्यायी ट्रान्सफार्मर बसवून त्याची चाचणी करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता पंपिग सुरू करून पाणी उपसा सुरू झाला. गुरूवारी सायंकाळी सहा वाजता फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरातील जलकुंभांत पाणी पडले.

यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत जलकुंभ भरल्यानंतर मागील बुधवारी व गुरूवारी सिडको-हडकोसह ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तेथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!