Share

विजयानंतर सुप्रिया सुळे म्हणतात…’ग्वाही देते विश्वासाला पात्र ठरू!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपने काल धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विजयी सुरुवात तर केली मात्र यात पुढे महाविकास आघाडी भाजपचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी झाली.

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने जनता महाविकास आघाडीला कौल देणार का? याची उत्सुकता निर्माण झाली होती. आघाडीला घवघवीत यश मिळालं असून भाजपच्या हक्काच्या नागपूर व पुण्यातील जागांवर देखील आघाडीने झेंडा फडकवला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला असून मत देणाऱ्या उच्च शिक्षितांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांचे आभार त्यांनी मानले. तर, दादा, जयंतराव आणि शिवसेनेतील सर्व सहकारी या सर्वांमुळे महाविकास आघाडीचा विजय झाला, लोकांनी विश्वास दाखवला. त्यांचे मनपूर्वक आभार, नतमस्तक होते व ग्वाही देते विश्वासाला पात्र ठरू’ असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!