Share

शरद पवारांच्या टीकेनंतर पुण्यात ‘या’ नेत्याने घेतला राजकीय संन्यास

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : तळेगावमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका केलेल्या बाळासाहेब नेवाळे  यांनी राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये कोणताही सहभाग घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या महाराष्ट्रातून सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे मावळमधील राष्ट्रवादी व भाजपमधील अटीतटीच्या सामना आहे. ऐनवेळी नेवाळे यांच्या राजीनाम्याने मावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शरद पवारांनी बाळासाहेब नेवाळे यांच्यावर भरसभेत घणाघाती टीका केली. भर सभेत पवारांनी नेवाळे यांना अध्यक्ष पद दिले, चेअरमन पद दिले तरी ही राष्ट्रवादीने काय दिले असं म्हणता अजून काय देऊ? असं म्हणत बाळासाहेब नेवाळे यांच्यावर निशाणा साधला होता. सध्याचे राजकारण पैसा घेऊन येणे आणि निवडून आले की मग पैसा कमवायचे, अशा प्रकारचे आहे. सध्या असे राजकारण मावळमध्ये सुरू असल्यामुळे या पुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचे नेवाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

नेवाळे गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत होते. जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच अनेक संस्थांचे चेअरमनपद त्यांनी भूषवले आहे. राष्ट्रवादी पक्ष हा डबघाईला आला असल्याचे सांगत नेवाळे यांनी आज सर्व पदांचे राजीनामे दिले. आज मावळमध्ये दिलेला उमेदवार हा भाजपाकडून आयात करण्यात आला असल्याची असल्याचे नेवाळे यांनी सांगितले. नेवाळे सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ आदींचे संचालक असून त्यांनी पवारांच्या टीकेनंतर आपल्या पदांचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1182990356100468742?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182990478070800385?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!