टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला पार पडल्या. मतमोजणीमध्ये शिवसेनेने अनपेक्षित मुसंडी मारल्याचे प्राथमिक कलांनुसार दिसून येत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ५० ते ६० जागा मिळतील, असे एग्जिट पोल्समध्ये अंदाज व्यक्त करण्यात येत होते. मात्र त्यांनीही सुमारे ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात निराळीच चर्चा रंगताना दिसत आहे.
मतमोजणीच्या कलांनुसार भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युतीचा होणार याबद्दल दुमत नाही. पण प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सभेत भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले होते. सेनेचे संजय राऊत यांच्याकडून ५०-५० चा फॉम्युला सांगण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचा की शिवसेनेचा अशी चर्चा सुरू झाली आहे.
#भाजपा ला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 24, 2019
या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. “भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल”, असे ट्विट सावंत यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
https://twitter.com/Maha_Desha/status/1187273448399073280?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187274466524483584?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

