टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दिशा सध्या चर्चेत आहेत. आदित्य ठाकरेंबरोबर ती डिनर डेटला गेलेली दिसली. त्या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री दिशा पटानी सध्या सोशल मीडियातून प्रचंड ट्रोल होत आहे.
जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफबरोबर या अभिनेत्रिचं नाव नेहमीच जोडलेल दिसत. ती टायगर श्रॉफला डेट करते. त्या दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही. हे माहीत असलेल्यांनी ‘टायगर जिंदा है आणि ‘एक था टायगर’, टायगर जिंदा है, अशी नावं घेत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने तर ‘खरा टायगर तर ठाकरेच आहे’, अशीही कमेंट एका वाचकाने केली.
आज मुंबईत आदित्य ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने आज जन्मदिवसाला खास व्यक्तीकडून गिफ्ट आले का ? असा प्रश्न विचारताच, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकाराकडे पाहून हात जोडले. डिनर मातोश्रीवर का बाहेर यावरही त्यांनी लाजत उत्तर देत, डिनर मातोश्रीवरच करणार असंही सांगितलं.
दिशाच ट्रोलर्सना उत्तर….
हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिशानं आपली बाजू स्पष्ट केली आहे. ‘तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? यात चुकीचं ते काय? असा प्रश्न तिनं विचारला आहे. प्रत्येकाला मित्र किंवा मैत्रीणी असतात. मैत्री करताना तुम्ही तो मुलगा आहे की मुलगी हे पाहत नाही. मी केवळ मुलींशीच मैत्री करावी असं नाहीये’
‘मी अशा क्षेत्रात काम करते जिथे प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. आता लोक माझ्याविषयी चुकीचा विचार करतात याची मला पर्वा नाही. मी फक्त माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करते’ असंही उत्तर दिशानं ट्रोलर्सनां दिलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

