Share

अभिनेता स्वप्निल जोशीने लेकीच्या वाढदिवसनिमित्त दिले गोड गिफ्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता स्वप्निल जोशी याची मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने सिनेसृष्टीत भक्कम असे स्थान निर्माण केल आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. कामात प्रचंड व्यस्त असल्याने जसा मोकळा वेळ मिळेल तसा तो कुटुंबासोबत घालवतो. स्वप्निल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सतत निरनिराळ्या पोस्ट तो चाहत्यांसोबत शेअर करतो.आता त्याच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसनिमित्त त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPNztP1lvFT/?utm_medium=copy_link

स्वप्निलने या वाढदिवसाच्या निमित्ताने आजी आणि नातीच्या सुंदर नात दाखवून दिल आहे. मायराचा वाढदिवस असल्याने स्वप्निल आणि त्याच्या आईने तिला अस्सल साजूक तुपातली आणि तेही आजीच्या हातची गरमागरम ‘पुरणपोळी’ अशी गोड भेटवस्तू दिली. चविष्ट पुरणपोळी खाऊन मायराही खूप खूश झालेली दिसते आणि शेवटी ती आजीला धन्यवाद करते. मायराच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रटींनीही कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. तर कोणताही अधिक खर्च न करता असा लाखमोलाचं नातं जपणारा वाढदिवस साजरा केल्याने त्याला अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. स्वप्निलला मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. मायरा ही मोठी, तर राघव लहान आहे.

स्वप्निल सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात गेस्ट म्हणून दिसत आहे. ‘समांतर २ ’ या वेबसीरिजमध्येही तो दिसणार आहे. ‘समांतर’चं पहिलय अभंगाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, आता दुसऱ्या पर्वात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी अनेकजण याची आतुरतेने वाट पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!