Share

आमच्या पुर्वजांनी देशासाठी बलिदान दिले तरीही संघाचे लोक देशभक्तीचे पुरावे मागतायेत – अबू आझमी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आमच्या पुर्वजांनी बलिदान दिले. त्यावेळी संघाचे लोक तुरुंगातून इंग्रजांना माफीची पत्रे लिहत होती. आणि हे लोक आता आम्हाला देश भक्तीचे पुरावे मागतायेत. आमच्या देशभक्तीचा पुरावा मागणारे हे लोक कोण ? असा सवाल समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आबु आझमी उपस्थित केला.

पुर्व मतदार संघाचे समाजवादी पार्टीचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्या प्रचारासाठी औरंगाबाद येथील किराडपूरा चौकात जाहीर सभा घेण्यात असली. त्यावेळी आजमी बोलत होते.

आझमी म्हणाले, हा देश आमचा आहे. तरी सुद्धा प्रत्येक वेळी पुरावे का मागितले जातात. शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात की मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या. संविधानाने दिलेला हा आमचा अधिकार काढण्याची भाषा करणारे हे कोण? आहे असेही आझमी म्हणाले.
समाजवादी पार्टी महाराष्ट्रात ५० उमेदवार उभे करु शकत होतो. मात्र संधी साधु पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याकरीता आम्ही काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. फक्त तीन सीट राज्यभरात उभ्या केल्या. आता पर्यंत औरंगाबादेत कधीही उमेदवार दिला नाही. मात्र यावेळी औरंगाबाद पूर्व मधून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.

कुलीम कुरेशी एक तरुण नेतृत्व आहे त्यांच्यात काम करण्याची उमेद आहे. हेच लक्षात घेवून त्यांना उमेदवारी देण्यात आली. धार्मिक घोषणा देण्याची बळजबरी करत एका व्यक्तीला पकडून अनेक लोक मारतात. त्याचा जीव घेतात. ही कुठली माणुसकी आहे. यापुढे मॉब लिचिंग करणाऱ्यांवर आतकंवादाचे गुन्हे दाखल करा. तरच हा प्रकार बंद होईल. असेही आझमी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182960024483577856?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182959730475454467?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!