टीम महाराष्ट्र देशा : सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. टीम इंडियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगवी जर्सी घालून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या जर्सीचे रंग सारखेच असल्याने भारतीय भगवी जर्सी घालून खेळणार आहे.
टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून आता राजकारण पेटू लागले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भगव्या जर्सीला विरोध दर्शिवला आहे. या निर्णयाविषयी बोलताना त्यांनी “मोदींना संपूर्ण देशाचं भगवीकरण करायचं आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवायला हवं की तिरंग्यामध्ये मुस्लिमांचा हिरवा रंगही आहे. अन्य रंगही तिरंग्यात आहेत, मग जर्शीसाठी केवळ भगव्या रंगालाच पसंती का? भारतीय संघाची जर्सी जर तिरंग्यात असेल तर ते उत्तम ठरेल”, असं अबू आझमी म्हणाले.
दरम्यान, आझमी यांनी सरकारवर निशाणा साधत ‘मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाचा विकास नाही, बेरोजगारी वाढत आहे. डॉलरचा भाव वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला भगवा रंग दिला जात आहे. त्याला तिरंग्याचा रंग द्यावयाला हवा, असं अबू आझमींनी नमूद केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

