Share

आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी, आढळरावांच्या विरोधातील काम भोवले ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: पुणे जिल्हा शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके यांच्यावर ठेवण्यात आला आहे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईची बडगा शिवसेनेकडून उगारण्यात आला आहे, पुणे शहरातील दोन्ही शहर प्रमुखांना पदावरून हटवण्यात आले आहे, आता बुचके आणि गावडे यांना देखील पक्षातून काढण्यात आलं आहे. आशा बुचके या २००२ पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी  आणि २०१४ मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेकडून विजयी झालेले जुन्नरचे आ. शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, सोनवणे यांच्या प्रवेशाला बुचके यांच्याकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीत पक्षात ग’टबाजी पहायला मिळाली, आयचा पक्षाला सर्वाधिक फटका जुन्नरमध्ये बसला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना ४६  हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!