पुणे : पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.
दरम्यान, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण तपास पुणे पोलीस करत असल्याने खुद्द पोलीस महासंचालक पुण्यात आले आहेत. ते स्वतः माहिती घेऊन लवकरात लवकर सत्य समोर येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पूजा चव्हाण हिचे नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक तिच्या मूळगावी गेले आहे. पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक ऍक्शन मोडमध्ये !
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण


