नांदेड : विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारचा विविध मुद्यांवरुन खरपूस समाचार घेतला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकरण, वीज पुरवठा खंडित करणे यावरुन दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. पूजा चव्हाण च्या मृत्यूला दहा दिवस उलटले तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असंही ते म्हणाले.
पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला १० दिवस उलटले तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पुरावे नष्ठ करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जातेय, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. संजय राठोड यांनी राजीनामा दिला असेल तर स्वागत आहे पण त्यांचा राजीनामा मंजूर करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलीय.
देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आणला होता. मात्र, राजकीय आकसापोटी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बासनात गुंडाळला, असा आरोप देरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
तसेच ‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी वाढीव वीज बिलाबद्दल विविध आश्वासनं दिली. मात्र, आता पूर्वसूचना दिल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. सरकारने ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. सरकारनं ते आश्वासनं पूर्ण केलं नाही. महावितरणकडून जुलमी पध्दतीने ग्राहकांची वीज तोडली जातेय,’ असं प्रविण दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- ‘रिहानाने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली, ते अतिशय नीच कृत्य आहे’
- फासे पलटणार ? आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही; मलिकांची फडणवीसांवर टीका


