Share

चमोली दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी भारताच्या स्टार फलंदाजाकडून मदतीचा हात

Published On: 

उत्तराखंड : उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यात रविवारी (०७ फेब्रुवारी) अतिशय भयावह घटना घडली. या जिल्ह्यातील रेणी गावातील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर (हिमकडा) कोसळले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चामोलीपासून ते हरिद्वारपर्यंतची कित्येक घरे वाहून गेली आहेत. प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

तर, ऋषीगंगा प्रोजेक्टचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.

बचाव टीमने आतापर्यंत 14 लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, परंतु 170 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. अशात माजी भारतीय क्रिकेटपटूंनी या शोकांतिकेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. या संपूर्ण घटनेने भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतला  दुखावला आहे आणि त्याने आता या कठीण परिस्थितीत पीडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पंतने रविवारी सायंकाळी उशिरा याबाबत एक ट्विट केले.

पंतने लिहिले की, “उत्तराखंडमधील जीवितहानीने फार दुःख झाले. मी बचाव कार्यासाठी माझी संपूर्ण मॅच फी देऊ इच्छितो आणि या दु:खाच्या क्षणी लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!