Share

काळजी वाढली! औरंगाबादेत तीन नवीन रुग्णांची करोना चाचणी पॉझिटिव्ह

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल रुग्णांपैकी दोघा जणांचा अहवाल कोविड 19 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर घाटीत प्रकृती गंभीर असलेल्या 65 वर्षीय महिला रुग्णाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णास मधुमेह, रक्तदाब, किडनीचा आजारही आहे, असे घाटीचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

घाटीतून मिनी घाटीस 13 जणांचे कोविड (कोरोना) तपासणी अहवाल प्राप्त झालेत. या अहवालामध्ये चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या एका अन्य रुग्णाचा देखील समावेश आहे. त्या व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णावर मिनी घाटीत उपचार सुरूच राहतील. मिनी घाटीत आज 72 रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी 17 जणांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. 52 जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. घाटीकडून मिनी घाटीस आज प्राप्त झालेल्या अहवालांपैकी उर्वरित 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण 22 पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

तर घाटीत 15 कोविड संशयित रुग्ण, 10 कोविड निगेटिव्ह व एक पॉझिटिव्ह असे एकूण 26 रुग्ण भरती आहेत. आज घाटीत 36 जणांची तपासणी करण्यात आली, त्यात तीन नवीन कोविड संशयित रुग्ण भरती झाले आहेत, असे डॉ. गायकवाड म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!