🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधितांची व यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. करोनाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसह व्यवस्थांसाठी येणाऱ्या खर्चात आर्थिक योगदान देण्याची इच्छा असल्यास राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या नंतर करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात निधीचा ओघ सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत २४५ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. याबाबतच वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे.
Till now, Maharashtra CM COVID19 Relief Fund has received contributions of Rs 245 Crores: Maharashtra Chief Minister's Office
— ANI (@ANI) April 16, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

