Share

जामखेडची जनता हे रोहित बाबूच पार्सल परत पाठवणार : देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कर्जत जामखेड मतदारसंघात या विधानसभेला हाय व्होल्टेज लढत पाहिला मिळनार आहे. त्यामुळे विद्यमान आ. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेड येथे आले होते. यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तर मावळच्या जनतेने ज्या प्रमाणे हिंमत दाखवत पार्थचे पार्सल परत पाठवले तशीच हिंमत कर्जत-जामखेडमधील जनता दाखवून देईल आणि रोहित पवारांना माघारी पाठवील, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार हे भाजप उमेदवार राम शिंदे यांना टक्कर देण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची असणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जात आहे. तर आज राम शिंदे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसही रिंगणात उतरले आहेत.

यावेळी फडणवीस म्हणाले की, जर कोणी या ठिकाणी येऊन साखर कारखानदारीच्या जोरावर शेतकऱ्यांना नागवत असेल तर आमचे नेते सुद्धा नवीन साखर कारखाने काढून ही मक्तेदारी मोडून काढतील. त्यामुळे मावळच्या जनतेने ज्या प्रमाणे हिंमत दाखवत पार्थचे पार्सल परत पाठवले तशीच हिंमत कर्जत-जामखेडमधील जनता दाखवून देईल आणि हे रोहित बाबूच पार्सल माघारी पाठवेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार ही मावळमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील रोहित पवार ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार यांनी गेली काही वर्ष या मतदारसंघात बांधणी केली असून राष्ट्रवादीने पूर्ण ताकद इथं लावली आहे. तर रोहित पवार यांनीही कमीतकमी वेळात जनतेशी चांगलाचं संपर्क वाढवला आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182642195213344768?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182636503861587968?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182625501011070978?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!