🕒 1 min read
पुणे : वांद्रे प्रकरणावरून राज्यातील विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर सोशल मीडियावर #UddhavResign हा ट्रेण्ड चालवला आहे. यावर मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर वांद्रे येथे झालेल्या गर्दीतून काही वेडवाकडं (नुकसान) करण्याचा प्रयत्न केलात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाळ काढतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्रचं काही वेडवाकडं (नुकसान) करण्याचा प्रयत्न केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा. ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही,’ असा इशारा देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
https://twitter.com/Rupalipatiltho1/status/1250456072562720771?s=20
दरम्यान राज आणि उद्धव या दोन बंधूंमधील राजकीय संघर्षाची चर्चा नेहमीच होते. मात्र आता कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं.


