नागपूर : कोरोनामुळे अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फर्लोे) रजेवर कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना आहे तिथेच थांबा व त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश कारागृह प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कारागृह प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर वृत्त हे दै. लोकमतने प्रसिद्ध केले आहे.
कारागृहात डांबलेल्या कैद्याला वर्षातून एकदा संचित रजेचा तर वर्षातून दोन वेळा अभिवचन रजेचा लाभ मिळतो. संचित रजेची मुदत २१ ते २८ दिवसांची असते. तर अभिवचन रजेची मुदत ४५ दिवसांपर्यंत मिळते. या रजा घेऊन कैदी आपल्या कुटुंबीयांसोबत काही काळ घालवतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवचन आणि संचितवर घरी गेले कैदी हे घरीच अडकले आहेत. या १२ कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा देखील समावेश आहे.
गेल्या महिनाभरात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून १२ कैदी संचित आणि अभिवचन रजेवर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. बाहेरून येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. राज्य कारागृह प्रशासनाने अभिवचन आणि संचित रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांच्या संबंधानेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार ज्या शहरातील कैदी कारागृहातून बाहेर गेले त्यांनी त्याच शहराच्या कारागृहात नमूद अवधीनंतर हजर (जमा) व्हायचे आहे. अर्थात, नागपूरचा कैदी मुंबईला गेला तर त्याने परत नमूद मुदतीनंतर नागपूरच्या कारागृहात नव्हे तर मुंबईच्याच कारागृहात जमा व्हावे, असा हा आदेश काढला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

